Ad will apear here
Next
‘उन्मत्त’ चित्रपटाला हाउसफुल प्रतिसाद
पुणे : अभिनेते विकास बांगर यांचा ‘उन्मत्त’ हा चित्रपट २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांबाहेर हाउसफुलचे बोर्ड लागून चित्रपट अजूनही गर्दी खेचत आहे. तरुणाईची कथा असलेला हा चित्रपट सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांना भावला आहे.

‘उन्मत्त’ हा एक सायफाय थ्रिलर असून, यामध्ये अॅक्शन, गाणी, ड्रामा अशा गोष्टींचा समावेश आहे. बॉडी डबल न वापरता केलेले अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना आवडत असून, तो चित्रपटाचा ‘यूएसपी’ ठरला आहे. विकास बांगर हे चायनामधून मार्शल आर्टस्चे रीतसर प्रशिक्षण घेऊन आले असून, याचाच उपयोग त्यांना चित्रपटामध्ये अॅक्शन सीन्स करताना झाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश राजमाने यांनी केले आहे. विकास यांच्यासह या चित्रपटात आरुषी वेदिका आणि पूर्णिमा डे यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची उत्तम बांधणी आणि वेगळा विषय असल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट हाउसफुल झाल्यामुळे संपूर्ण टीमला आनंद झाला असून, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZXCBY
Similar Posts
‘उन्मत्त’ २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार पुणे : २४ एफएस यांची निर्मिती असलेला ‘उन्मत्त’ हा चाकोरीबाह्य चित्रपट २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘स्लीप पॅरालिसीस’चा अनाकलनीय अनुभव स्वत: अनुभवल्यानेच माझ्या अनुभवावर आधारीत या चित्रपटाची कथा लिहिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला
‘मराठी चित्रपटात काम करायचे आहे’ पुणे : ‘महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता मराठी काम करायचे आहे,’ अशी भावना अभिनेता शर्मन जोशी याने येथे व्यक्त केली.
‘शेंटिमेंटल’चा ‘टीझर’ प्रदर्शित कोल्हापूर : ‘पोस्टर बॉइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’मुळे हसता हसता ‘सेंटिमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना दिलेल्या पोस्टररूपी आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता नुकत्याच प्रदर्शित
‘शेंटीमेंटलमुळे’ महाराष्ट्र होणार हसून हसून ‘मेंटल!’ कोल्हापूर : ‘पोस्टर बोइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या धमाल ‘मॅड कॉमेडी’ चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवल्यानंतर समीर पाटील आता ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसून हसून मेंटल बनवायला सज्ज झाले आहेत. सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language